शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

मजुरांसाठी सोमवार ठरला 'डायमंड डे'; एकाच दिवशी सापडले 7 मौल्यवान हिरे, किंमत तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 4:09 PM

अधिकाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, एका हिऱ्याची किंमत 60 लाखांपेक्षा अधिक आहे.

पन्ना: मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) पन्नामध्ये(Panna) हिऱ्याचे मोठे भांडार आहे. या ठिकाणी अनेकदा हिरा सापडल्याच्या बातम्या समोर येतात. अशीच एक बातमी आता समोर आली आहे. एकाच दिवशी चार मजुरांना हिरे मिळाले आहेत. दोघांना तीन मोठे हिरे आणि इतर दोघांना चार छोटे हिरे मिळाले आहेत. 

13.54 कॅरेटचा हिरा सापडलामिळालेल्या माहितीनुसार, पन्नातील रतनगर्भा परिसारील कृष्णा कल्याणपूर खाण परिसरात हे सर्व हिरे सापडले आहेत. मजुरांनी हे सर्व हिरे कार्यालयात जमा केले आहेत. हिरे कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले की, राहुनिया गावचे रहिवासी मुलायम सिंह गौर यांना 13. 54 कॅरेटचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा मौल्यवान आणि सर्वोत्तम दर्जाचा आहे.

मुलायम सिंह यांच्यासह पन्नाच्या एनएमडीसी कॉलनीत राहणाऱ्या रोहित यादवलाही हिरे सापडले आहेत, ज्यामध्ये 6 , 8 आणि 4.68 कॅरेटच्या हिऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, शिवराजपूर येथील शारदा विश्वकर्मा यांना दोन छोटे हिरे मिळाले आहेत. हे सर्व हिरे सध्या हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून आगामी लिलावात ठेवण्यात येणार आहेत.

लिलावानंतर रक्कम मिळेल

अनुपम सिंह यांनी सांगितले की, मजुरांनी जमा केलेले हिरे लिलावाद्वारे विकले जातील. विक्रीनंतर मध्य प्रदेश सरकारची 10 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम या गरीब मजुरांना दिली जाईल. 13.54 कॅरेटच्या हिऱ्याची किंमत 60 लाखांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. एका अंदाजानुसार, रॉयल्टीची रक्कम कापूनही शेतकरी मुलायम सिंह यांना 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. ही केवळ अंदाजे रक्कम आहे, लिलावानंतरच खरी स्थिती कळेल. तर, इतर हिऱ्यांनाही लाखो रुपये किमत मिळण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके