शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चार वर्षांत १,८२२ घुसखोर देशाबाहेर, काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:55 IST

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ४० लाख लोकांची नावे गायब झाल्यानंतर काँग्रेस व भाजपा एकमेकांवर आरोप करीत असून, अधिक विदेशी लोकांना कोणी बाहेर काढले, यावरून त्यांच्यात जुंपली आहे.एनआरसीची सुरुवात आम्हीच केली व ८२ हजार घुसखोरांना देशाबाहेर काढले होते. स्व. राजीव गांधी यांनी विदेशी नागरिकांच्या प्रश्नावर जो आसाम करार केला होता त्या पार्श्वभूमीवरच एनआरसीची सुरुवात झाली, असे सांगून काँग्रेस स्वत:कडे श्रेय घेत आहे. मात्र काँग्रेसने विदेशींनी बाहेर काढण्यासाठी काहीही केले नाही, असा भाजपाचा आरोप आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशी नागरिकांबाबत आपले धोरण काय आहे ते सांगावे, अशी मागणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. मात्र सरकारी आकड्यांनुसार, २००५ मध्ये १४,९१६ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले. हा आकडा २००६ मध्ये १३,६९२. २००७ मध्ये १२,१३५, २००८ मध्ये १२,६२५, २००९ मध्ये १०,६०२ व २०१० मध्ये ६,२९० होता. तसेच २०११ मध्ये ६,७६१ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविले. नंतर २०१२ मध्ये ६,५३७ तर २०१३ मध्ये ५,२३४ काँग्रेस सरकारने बांग्लादेशात परत पाठविले. म्हणजेच २००५ ते २०१३ पर्यंते ८२,७२८ बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्यात आले.>भाजपाच्या काळात...मोदी सरकारने २०१४ मध्ये आल्यापासून पहिल्या वर्षी ८९८, २०१५ मध्ये ४७४, २०१६ मध्ये ३०८ आणि २०१७ मध्ये ५१ बांग्लादेशींना बाहेर काढले. म्हणजे ४ वर्षांत १८२२ बांगलादेशींना देशातून बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी