चार वर्षाच्या मुलीवर स्कूलबसमध्ये बलात्कार
By Admin | Updated: January 20, 2016 14:15 IST2016-01-20T14:15:07+5:302016-01-20T14:15:07+5:30
मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवारी स्कूलबसमध्ये चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

चार वर्षाच्या मुलीवर स्कूलबसमध्ये बलात्कार
ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. २० - मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवारी स्कूलबसमध्ये चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. चारवर्षांची ही चिमुकली नर्सरीमध्ये आहे. पोलिसांनी या प्रकरणी बसचा कंडक्टर महेश बागवानला अटक केली आहे. सर्व मुले बसमधून उतरल्यानंतर महेशने धावत्या बसमध्ये चिमुकलीवर बलात्कार केला.
पीडित मुलगी चार वर्षांची असून , घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी लगेचच पोलिस स्थानक गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.
कंडक्टर महेश बागवान पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात ड्रायव्हरची भूमिका संशयास्पद असून, पोलिस ड्रायव्हरचीही चौकशी करत आहे.