दिल्लीमध्ये काश्मिरी लोकांना बेदम मारहाण चार महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:04 IST2018-05-13T01:04:29+5:302018-05-13T01:04:29+5:30

राजधानी दिल्लीच्या दक्षिण भागात असलेल्या सनलाइट कॉलनीत राहणाऱ्या काश्मीरमधील पाच जणांना स्थानिक

Four women were injured in the assault of the Kashmiri people in Delhi | दिल्लीमध्ये काश्मिरी लोकांना बेदम मारहाण चार महिला जखमी

दिल्लीमध्ये काश्मिरी लोकांना बेदम मारहाण चार महिला जखमी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या दक्षिण भागात असलेल्या सनलाइट कॉलनीत राहणाऱ्या काश्मीरमधील पाच जणांना स्थानिक लोकांच्या जमावाने गुरुवारी रात्री बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे तेथील बंदोबस्तात वाढ केली आहे. या मारहाणीची चौकशी सुरू आहे. मारहाणीमुळे तिथे राहणारे सारेच काश्मिरी घाबरून गेले आहेत. आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार ज्या पाच जणांना मारण्यात आले, त्यात चार महिलाही आहेत. त्यांना ३0 ते ४0 जणांच्या जमावाने गुरुवारी रात्री घेरले आणि मारण्यास सुरुवात केली. तुम्ही काश्मिरी दहशतवादी आहात, असे म्हणत, तुम्ही येथून निघून जा, दहशतवाद्यांना मारलेच पाहिजे, अशी आरडाओरड हा जमाव करीत होता. आम्ही काश्मीरचे असल्यामुळेच मारहाण करण्यात आली, अशी तक्रार आहे.

Web Title: Four women were injured in the assault of the Kashmiri people in Delhi