काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवान शहीद
By Admin | Updated: May 21, 2017 19:41 IST2017-05-21T19:05:17+5:302017-05-21T19:41:56+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम विभागात लष्काराने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवान शहीद
ऑनलाइन लोकमच
श्रीनगर, दि. 21 - जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम विभागात लष्काराने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर या कारवाईत तीन जवानांना वीरमरण आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरातील नौगाम विभागात काल नियंत्रण रेषेवर मोठ्या शस्त्रसाठ्यासह सज्ज असलेला काही दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात होता. लष्कराला याची माहिती मिळताच त्वरित कारवाई करून या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबारास सुरुवात केली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तर दोन दहशतवाद्यांना कालच ठार करण्यात आले होते.दरम्यान, ही चकमक आजही सुरु होती.
शुक्रवारी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा देताना नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्याचे चोख प्रत्युत्त देण्यात येईल, असे सांगितले होते. त्याला एक दिवस उलटत नाही तोच दहशतवाद्यांनी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
#UPDATE In Nowgam operation that began y"day, a total of 4 terrorists killed & 3 soldiers lost lives. 4 weapons & warlike stores recovered.
— ANI (@ANI_news) May 21, 2017