शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:28 IST

चिंतेत भर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका

ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये बी. १.६१७.३, डेल्टा व्हेरिएंट (बी.१.६१७.२), बी. १.१.३१८ आणि लॅम्बडाचा (सी.३७) समावेश आहे

नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आता आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डेल्टा प्लस (बी. १.६१७.२.१) सोबतच कोविड १९ चे किमान चार नवे व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतात, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोना विषाणूच्या चार नव्या व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये बी. १.६१७.३, डेल्टा व्हेरिएंट (बी.१.६१७.२), बी. १.१.३१८ आणि लॅम्बडाचा (सी.३७) समावेश आहे. कोरोनाचा लॅम्बडा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये आढळून आला आहे. कोरोनाच्या कापा व्हेरिएंटवरही (बी१.६१७.१) लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र, हा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या तुलनेत कमी संक्रमक आहे. कोरोनाचे बी. १.६१७.३ आणि बी. १.१.१.३१८ व्हेरिएंट भारतात आढळून आले आहेत. मात्र, लॅम्बडा व्हेरिएंटचा रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही. लॅम्बडा व्हेरिएंट जगातील बऱ्याच देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीमुळे या व्हेरिएंटसह नव्या व्हेरिएंटचे कॉकटेल भारतात येऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोनाच्या नव्या रूपांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी जीनोम सिक्वन्सिंग करण्याची गरज आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...

nम्युटेशन झाल्यानंतर विषाणूचा फैलाव वाढतो. त्यांच्या संक्रमणाच्या वेगात वाढ होते. त्यामुळे जीनोम सिक्वन्सिंग वाढविण्याची गरज असल्याचे मत हैदराबादमधील यशोदा रुग्णालयाचे सल्लागार डॉ.विघ्नेश नायडू यांनी व्यक्त केले. 

nलॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची गरज इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ इंग्लंड या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. nभारतात लॅम्बडाचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. जीनोम सिक्वन्सिंग वाढविल्यास कदाचित याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकेल. nआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक वाढल्यास लॅम्बडा व्हेरिएंट भारतात शिरकाव करू शकेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस