बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 10:55 IST2021-04-22T10:53:22+5:302021-04-22T10:55:32+5:30
four more rafale aircraft arrive in india from france: देशात आतापर्यंत १८ राफेल विमानं दाखल; हवाई दलाच्या अंबाला तळावर तैनात

बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्ण
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलात आणखी चार राफेल विमानांचा समावेश झाला आहे. काल रात्री ११ वाजून मिनिटांनी ४ राफेल विमानं भारतात दाखल झाली. फ्रान्समधून उड्डाण केलेल्या राफेल विमानांनी सलग आठ हजार किलोमीटरचं अंतर कापलं. फ्रान्सच्या हवाई दलानं आणि यूएईनं राफेल विमानात हवेतच इंधन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. (four more rafale aircraft arrive in india from france)
बुधवारी फ्रान्सच्या मॅरिग्नेक बॉरडॉक्स विमानतळावरून ४ राफेल विमानांनी उड्डाण केलं. हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी विमानांना हिरवा कंदिल दाखवला. राफेल विमानांची पाचवी खेप भारतात दाखल झाली आहे. त्यामुळे देशात दाखल झालेल्या विमानांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता भारतीय हवाई दलाकडे राफेलची एक स्क्वाड्रन पूर्ण झाली आहे.
राफेल विमानांची एक स्क्वाड्रन अंबाला हवाई तळावर तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाला राफेल विमानांची आणखी एक एक स्क्वाड्रन मिळणार आहे. ती पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई तळावर तैनात केली जाईल. भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया सोमवारपासून फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्सकडून भारताला पाठवण्यात येणाऱ्या विमानांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी भदौरिया फ्रान्सला गेले आहेत.