ट्रक-दुचाकी अपघातात चार ठार
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:01+5:302015-03-08T00:31:01+5:30
ट्रक-दुचाकी अपघातात चार ठार

ट्रक-दुचाकी अपघातात चार ठार
ट रक-दुचाकी अपघातात चार ठारकमलनगर(जि. बीदर) : कर्नाटकातील भालकी तालुक्यात धुळवड साजरी करण्यासाठी निघालेल्या उदगीरच्या चार युवकांचा शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला़ त्यांच्या दुचाकीची आणि ट्रकची कमलगरजवळ समोरासमोर धडक बसल्याने चौघांचा जागीच मृत्यूू झाला़ उदगीर येथील महादेव शंकर वरदाळे ( १८), दिगंबर तुकाराम गठ्ठडे (३०), संतोष गंगाराम गायकवाड (३०) व उमेश सिद्रामप्पा पाटील (२२, मूळ गाव मरुर ता़भालकी) यांनी शुक्रवारी सकाळी उदगीर शहरात धुळवड खेळली़ त्यानंतर उमेश पाटील याच्या मरुर गावी जाण्याचा बेत आखला़ चौघेही दुचाकीवरुन उदगीर येथून मरुरला जाण्यासाठी निघाले़ दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमलनगरच्या पुढे धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीची भालकीहून येणार्या मिनीट्रकला धडक बसली़ यात दुचाकीवरील चौघांचाही जागीच मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़