शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चकमकीत चार जवान शहीद;जम्मूृ-काश्मीरच्या मछीलमध्ये तीन अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 1:18 AM

शहीद झालेल्या चौघांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील मचील क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव  सुरक्षा दलाने रविवारी पहाटे हाणून पाडला. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे चार जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले. तसेच सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

शहीद झालेल्या चौघांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र अद्याप त्यांच्याबद्दल अधिक तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. कुपवाडा जिल्ह्यातील मचील भागात रविवारी पहाटे सीमेपलीकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला. त्यावेळी दहशतवाद्यांशी कडवी झुंज देताना लष्कराचा एक अधिकारी, दोन जवान व सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान असे चार जण शहीद झाले. गेल्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सातत्याने सुरूच आहेत. (वृत्तसंस्था) 

काही तास  चालली चकमक 

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, सीमेपलीकडून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी त्यांना रोखले. त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये काही तास चकमक झाली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान