अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:46 IST2024-05-20T15:44:00+5:302024-05-20T15:46:45+5:30
हे चार दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
गुजरातमधील अहमदाबादमध्ये इस्लामिक स्टेटच्या ४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, हे चारही दहशतवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित असून त्यांचे श्रीलंकन कनेक्शनही समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
मिळालेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांची चौकशी सुरू केली आहे. अहमदाबाद विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने आले होते, याची माहिती मिळालेली नाही. त्यांच्याकडून मिळालेल्या तिकिटांच्या आधारे ते चेन्नईहून आल्याचे सांगण्यात येत आहे . इस्लामिक स्टेटचे हे दहशतवादी कोलंबोहून तामिळनाडूत आणि तामिळनाडूतून अहमदाबादमध्ये आले आहेत.
Four ISIS terrorists, who are Sri Lankan nationals, arrested at Ahmedabad airport: Gujarat ATS pic.twitter.com/pTHwPlZfnM
— ANI (@ANI) May 20, 2024