चार इमारती उद्ध्वस्त झाल्याचे आहेत पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 03:13 IST2019-03-03T03:13:56+5:302019-03-03T03:13:59+5:30

भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाकच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदतर्फे चालणाऱ्या मदरशांच्या चार इमारती उद्ध्वस्त केल्याचे उघड झाले आहे.

Four buildings have been destroyed | चार इमारती उद्ध्वस्त झाल्याचे आहेत पुरावे

चार इमारती उद्ध्वस्त झाल्याचे आहेत पुरावे

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाकच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदतर्फे चालणाऱ्या मदरशांच्या चार इमारती उद्ध्वस्त केल्याचे उघड झाले आहे. इथे मरदशांच्या नावाखाली दहशतवाद्यांच्या राहण्याची सोय केली होती. मौलाना मसूद अझहरचा भाऊ युसूफही तिथेच राहत होता.
जैशच्या तालिम उल कुराण या मदरशाच्या चार इमारती जमीनदोस्त झाल्याचे भारतीय गुप्तचरांच्या सिंथेटिक अपार्चर रडार (एसएआर) छायाचित्रांमधून समोर आले.

Web Title: Four buildings have been destroyed