ट्रक चालकाला लुटणार्‍या चौघांना अटक

By Admin | Updated: March 6, 2016 22:07 IST2016-03-06T22:07:08+5:302016-03-06T22:07:08+5:30

जळगाव: ट्रक चालकाला मारहाण करुन त्याच्या जवळील २२ हजार शंभर रुपये रोख व मोबाईल हिसकावून फरार झालेल्या राहुल मनोज गाडे (रा.कांचन नगर), दीपक प्रकाश भोसले, संदीप भास्कर ढोके व फिरोज शेख अन्सारी (तिन्ही रा.गेंदालाल मील) या चौघ संशयितांना शनी पेठ पोलिसांनी रविवारी अटक केली.

Four arrested for robbing truck driver | ट्रक चालकाला लुटणार्‍या चौघांना अटक

ट्रक चालकाला लुटणार्‍या चौघांना अटक

गाव: ट्रक चालकाला मारहाण करुन त्याच्या जवळील २२ हजार शंभर रुपये रोख व मोबाईल हिसकावून फरार झालेल्या राहुल मनोज गाडे (रा.कांचन नगर), दीपक प्रकाश भोसले, संदीप भास्कर ढोके व फिरोज शेख अन्सारी (तिन्ही रा.गेंदालाल मील) या चौघ संशयितांना शनी पेठ पोलिसांनी रविवारी अटक केली.
या गुन्‘ात एकुण सहा आरोपी होते, त्यातील दोन जण अल्पवयीन आहेत. रमेश उर्फ बंडू पांडूरंग गायकवाड (वय ३६ रा.चाळीसगाव) यांना २८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता नेरी नाका येथील हार्डवेअरच्या दुकानासमोर सहा जणांनी मारहाण करुन त्यांच्या खिशातील २२ हजार रुपये व मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयितांची ओळख निष्पन्न झाली, मात्र ते मिळून येत नव्हते. शविवारी रात्री चौघे जण पोलिसांच्या हाती लागले. रविवारी अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या.प्रतिभा पाटील यांनी चौघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Four arrested for robbing truck driver