Four arrested in connection with 'Jash' | Pulwama Attack : ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित चार जणांना अटक
Pulwama Attack : ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित चार जणांना अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अरिहलमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणि तो घडवून आणण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पुलवामाच्या अरिहालमध्ये जुलैमध्ये झालेल्या एका स्फोटप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना शारीफ अहमद नावाच्या एका व्यक्तीबाबत संशय होता. तो एका विदेशी दहशतवाद्याशी सातत्याने संपर्कात होता. अहमदने जैशशी संबंधित तीन अन्य व्यक्ती आकिब अहमद, आदिल अहमद मीर आणि ओवैस अहमद यांच्यासोबत कट रचला. हा स्फोट घडवून आणला.

अड्ड्याचा पर्दाफाश
सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी एक स्फोटक सेट आणि एक वायरलेस सेट जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरनकोटच्या जंगलात संशयित लोकांच्या हालचाली होत असल्याची माहिती ग्रामीण भागातील लोकांनी दिली.
त्यानंतर या भागात सर्च आॅपरेशन करण्यात आले. यात सात आयईडी, गॅस सिलिंडर आणि एक वायरलेस सेट या जंगलातून जप्त करण्यात आला. आतापर्यंत कोणत्याही संशयिताला पकडण्यात आलेले नाही.

English summary :
Pulwama Attack : Four people have been arrested in connection with the Jaish-e-Mohammed who had done terrorist attack in Pulwama district of Jammu and Kashmir. For more latest news in Marathi follow Lokmat.com. Stay updated.


Web Title: Four arrested in connection with 'Jash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.