प्रजासत्ताकदिनी अयाेध्येत मशिदीची पायाभरणी?; बाबरीपेक्षा भव्य मशीद उभारली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:48 IST2020-12-18T03:29:52+5:302020-12-18T06:48:49+5:30
न्यायालयाने अयाेध्येजवळ धन्नीपूर या गावात वक्फ बाेर्डाला पाच एकर जागा दिली हाेती. त्या जागेवर लवकरच कामास सुरुवात करण्याचा वक्फ बाेर्डाचा विचार सुरू आहे.

प्रजासत्ताकदिनी अयाेध्येत मशिदीची पायाभरणी?; बाबरीपेक्षा भव्य मशीद उभारली जाणार
अयाेध्या : उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बाेर्डाकडून प्रजासत्ताकदिनी अयाेध्या येथे मशिदीच्या कामाची पायाभरणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
सर्वाेच्च न्यायालयाने सुमारे वर्षभरापूर्वी राम मंदिरप्रकरणी निर्णय दिला हाेता. न्यायालयाने अयाेध्येजवळ धन्नीपूर या गावात वक्फ बाेर्डाला पाच एकर जागा दिली हाेती. त्या जागेवर लवकरच कामास सुरुवात करण्याचा वक्फ बाेर्डाचा विचार सुरू आहे. देशाची घटना या दिवशी लागू झाल्यामुळे पायाभरणीसाठी बाेर्डाचे सर्व सदस्य २६ जानेवारी या तारखेबाबत आग्रही आहेत. बाबरी मशिदीपेक्षा ही मशीद भव्य असणार आहे; परंतु जुन्या बांधकामासारखी याची रचना राहणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मशिदीच्या रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. सुमारे २ हजार जणांना नमाजपठण करता येईल, एवढी जागा मशिदीमध्ये राहणार आहे.