Mohammad Hamid Ansari: “भारतात असहिष्णुता, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ट्रेंड वाढतायत”: माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:51 IST2022-01-27T16:49:48+5:302022-01-27T16:51:36+5:30
Mohammad Hamid Ansari: हिंसा आणि भेदभावाला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप मोदी सरकारवर करण्यात आला आहे.

Mohammad Hamid Ansari: “भारतात असहिष्णुता, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ट्रेंड वाढतायत”: माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
नवी दिल्ली: देशाचे माजी राष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी (Hamid Ansari) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या एका वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा देशभरात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू शकतात, अशी चर्चा आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनी एका कार्यक्रमात बोलताना हमीद अन्सारी यांनी भारतातील असहिष्णुता वाढत असून, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ट्रेंड वाढत चालले आहेत, असा दावा केला आहे.
इंडियन-अमेरिकन मुस्लीम काऊन्सिल यांच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपदी हमीद अन्सारी यांनी व्हर्चुअल पद्धतीने सहभागी झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत आपल्या घटनात्मक मूल्यांपासून दूर जातोय. अन्सारी यांच्या विधानाला अमेरिकेतील चार संसद सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. एड मर्की, जिम मॅकगवर्न, एंडी लेविन आणि जेमी रस्किन यांनीदेखील आपल्या संबोधनात भारतविरोधी मते मांडली.
भारतात असहिष्णुता, सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ट्रेंड वाढतायत
भारतात असहिष्णुता वाढत चालली आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे नवनवीन ट्रेंड समोर येत असून, त्यांची संख्याही वाढत चालली आहे. भारतात होऊ घातलेल्या निवडणुकांमधील बहुमत हे धार्मिक बहुमताच्या आधारे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांच्या आस्थेचा वापर करून त्यांच्यात दरी निर्माण केली जात आहे. तसेच असुरक्षिततेला प्रोत्सान दिले जात आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकन संसद सदस्य यापूर्वीही अनेकदा भारताविरोधात बोलल्याचा इतिहास आहे. भारत सरकार अल्पसंख्यांकांच्या प्रथांना टार्गेट करत असून, हिंसा आणि भेदभावाला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.