शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 21, 2020 7:37 PM

माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देउप राष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.माजी राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे. शिया धर्मगुरू म्हणाले, आपल्या देशात कट्टरता नाही.

नवी दिल्ली - नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे माजी उप राष्ट्रपती हामीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादाला 'महामारी', असे म्हटले आहे. शशी थरूर यांचे नवे पुस्तक 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग'च्या प्रकाशनदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, सध्या आपला देश 'प्रकट आणि अव्यक्त' विचार तथा विचारधारांच्या धोक्यातून जात आहे. यात देशाला 'आपण आणि ते' या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिया धर्मगुरूंनी साधला निशाणा -माजी उप राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास यांनी व्हिडिओ जारी करत निशाणा साधला आहे. शिया धर्मगुरू म्हणाले, आपल्या देशात कट्टरता नाही. आपला देश एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे हिंदू, मुस्लीम,शीख,ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी लोक एकत्रित राहतात. माझा देश एखाद्या पुष्पगुच्छा प्रमाणे आहे.

हामीद अन्सारी यांना बोलायचेच होते, तर त्यांनी कुण्या एका व्यक्तीवर बोलायचे होते. संपूर्ण देशाला आपल्या बोलण्यात सामील करायचे नसते. येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हिंदू, मुसलमान, शीख सर्वच भावांनी रक्तत सांडले आहे. हामीद अन्सारी हे काय म्हणत आहेत, की आपल्या संपूर्ण देशात कट्टरतेचे वातावरण आहे? मात्र, असे नाही. आपल्या देशात कसल्याही प्रकारचे कट्टरतेचे वातावरण नाही. कारण येथे हिंदूंचा दरवाजा मुसलमानांच्या दरवाज्याला लागून आहे. तसेच मुसलमानांचा दरवाजाही हिंदू भावांच्या दरवाजाला लागून आहे. येथे नातलग नंतर उभे राहतात, आधी मित्र आणि जिवाभावाचे लोक उभे राहतात.

आणखी काय म्हणाले होते अन्सारी - चार वर्षांच्या अल्पावधीतच, भारत उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे वाटचाल करत आहे. जी सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे कार्यरत आहे. कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे.” धार्मिक कट्टरपणा आणि कट्टरपंथी राष्ट्रवादाच्या तुलनेत. देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे असं हमीद अन्सारी म्हणाले.

फारूक अब्दुल्लांनीही घेतला होता चर्चेत भाग -या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले, "१९४७मध्ये आम्हाला पाकिस्तानबरोबर जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांना आणि इतरांना असे वाटले की, दोन राष्ट्रांचे तत्त्व आमच्यासाठी चांगले नाही. सध्याचे सरकार ज्या दृष्टीने देशाकडे पाहत आहे, त्याला कधीही स्वीकारणार नाही. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरIslamइस्लामMuslimमुस्लीमHinduहिंदूIndiaभारत