शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 22:14 IST

लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गेल्या दीड महिन्यांपासून होते आजारी.

ठळक मुद्देलखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. गेल्या दीड महिन्यांपासून होते आजारी.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होती. याशिवाय उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथही डॉक्टरांच्या संपर्कात होते. परंतु शनिवारी रात्री कल्याण सिंह यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन कल्याण सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवही ठेवण्यात आलं होतं, शिवाय हाय प्रेशर ऑक्सिजनही देण्यात आलं होतं. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली.  ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना एसजीपीजीआय लखनौ येथे दाखल करण्यात आलं. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला होता.

अलीगढमध्ये झाला होता जन्म५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.

युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्रीकल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर  १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथhospitalहॉस्पिटल