शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

"...यालाच तर प्रामाणिकपणा म्हणतात", खासदार गंभीरची नाव न घेता 'आप'वर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 15:59 IST

दिल्ली सरकार आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे.

दिल्ली सरकार आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका आम आदमी पार्टी करत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीची टांगती तलवार असताना दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या पथकाने रविवारी पहाटे मंत्री आतिशी मार्लेना यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. तेव्हा आतिशी त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. अशा परिस्थितीत आतिशी न सापडल्याने गुन्हे शाखेचे पथक घराबाहेर काही अंतरावर थांबले. यानंतर दुपारी गुन्हे शाखेचे पथक पुन्हा एकदा आतिशी मार्लेनांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली.

गंभीरची नाव न घेता 'आप'वर टीकातपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे 'आप'चे नेते सांगत आहेत. अशातच भाजपा खासदार गौतम गंभीरने यावरून 'आप'वर नाव न घेता टीका केली. माजी खेळाडू आणि भाजपाचा खासदार गंभीर म्हणाला की, तपास यंत्रणा त्यांचे काम करत आहेत आणि आपण त्यांना ते करू दिले पाहिजे. मला विश्वास आहे की, जर तुमची काही चूक नसेल अथवा तुम्ही सत्याच्या बाजूने असाल तर पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही. खरं तर यालाच प्रामाणिकपणा म्हणतात. त्यामुळे सर्वांनी तपास यंत्रणांना सहकार्य करायला हवे, असे गंभीरने 'आप'च्या आमदारांना ईडीने लक्ष्य केल्यानंतर म्हटले. 

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना आणि अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच भाजपावर आम आदमी पार्टीच्या काही आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना गांभीर्याने घेत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्याअंतर्गत रविवारी सकाळी क्राइम ब्रँचचे एसीपी स्वत: आतिशी मार्लेनांच्या घरी नोटीस बजावण्यासाठी पोहोचले. दरम्यान, गुन्हे शाखेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून तीन दिवसांत नोटीसचे उत्तर मागितले आहे.

अलीकडेच केजरीवाल यांनी दिल्लीतील त्यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. यानंतर दिल्लीतील 'आप' सरकारमधील मंत्री आतिशी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपाने दिल्लीत 'ऑपरेशन लोटस २.०' सुरू केल्याचा आरोप केला. आतिशी म्हणाल्या होत्या की, 'आप'च्या आमदारांना पैशाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल