कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बंगालच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला एक अत्यंत विश्वासू सहकारी गमावला आहे.
मुकुल रॉय यांना बंगालच्या राजकारणातील 'चाणक्य' मानले जात असे. तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाला सत्तेपर्यंत नेण्यात त्यांची भूमिका अत्यंत कळीची होती. यूपीए सरकारच्या काळात त्यांनी भारताचे रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
ममता बॅनर्जींनंतर तृणमूलमध्ये त्यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे मानले जात असे. बूथ स्तरापर्यंत पक्ष पोहोचवण्यात त्यांचा मोठा हात होता.
भाजप प्रवास आणि घरवापसीमुकुल रॉय यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. २०१७ मध्ये त्यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, जिथे त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. मात्र, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये 'घरवापसी' केली होती. गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते.
ममता बॅनर्जींकडून शोक व्यक्तमुकुल रॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मुकुल यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. तो केवळ एक नेता नव्हता, तर पक्षाचा आधारस्तंभ होता."
Web Summary : Trinamool Congress founder Mukul Roy, a key figure in West Bengal politics, has died after a prolonged illness. Roy, considered the 'Chanakya' of Bengal politics, played a crucial role in the party's rise. Mamata Banerjee mourns the loss of her trusted aide.
Web Summary : पश्चिम बंगाल के दिग्गज नेता और तृणमूल कांग्रेस के संस्थापक सदस्य मुकुल रॉय का लंबी बीमारी के बाद निधन हो गया। बंगाल की राजनीति में 'चाणक्य' माने जाने वाले रॉय ने पार्टी को सत्ता में लाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। ममता बनर्जी ने अपने विश्वसनीय सहयोगी के निधन पर शोक व्यक्त किया।