शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

By सायली शिर्के | Updated: September 26, 2020 11:16 IST

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सर्व मंडळींनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं देखील म्हटलं आहे. 

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. एक अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

अर्थशास्त्रत्र म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी नंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव यांनी त्यांना राजकारणात आणत वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली होती. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा अनपेक्षितरीत्या पराभव झाला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अनपेक्षितरीत्या पंतप्रधानपदाची माळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली.

मनमोहन सिंग यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या कणखरतेची साक्ष देणारे 

उच्चशिक्षित असलेल्या मनमोहन सिंग यांच्याबाबत आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांना हिंदी वाचता येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदीतून भाषण करण्याची गरज भासल्यावर ते उर्दूमधून लिहून घेत असत. तसेच भाषण देण्यापूर्वी त्याचा सराव करत असत. मनमोहन सिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून नेहमीच करण्यात आला. मात्र त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या कणखरतेची साक्ष देणारे ठरले. 2008 मध्ये झालेल्या भारत-अमेरिका अणुकरारासाठी त्यांनी आपले सरकार पणाला लावले होते. तसेच त्यांच्या दुरदृष्टीमुळेच भारत विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करू लागला.

महत्त्वाच्या बातम्या

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

Bharat Bandh : "ना मोबदला, ना सन्मान; नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार"

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारत