"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 05:34 PM2024-05-23T17:34:18+5:302024-05-23T17:43:01+5:30

जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना परदेशातून भारतात परतण्याचा इशारा दिला आहे.

Former Prime Minister HD Deve gowda has warned MP Prajwal Revanna to return to India | "माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा

"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा

गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटकात कथित सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. यानंतर कर्नाटकात गोंधळ सुरू आहे. आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन सुरू आहेत. सेक्स स्कॅन्डलबाबत प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आरोप सुरू आहेत. रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. दरम्यान, आता जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना परदेशातून भारतात परतण्याचा इशारा दिला आहे आणि अश्लील व्हिडीओ स्कँडलच्या सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असं सांगितलं आहे. प्रज्वल दोषी आढळल्यास त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंही एचडी देवेगौडा म्हणाले. 

"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा

एचडी देवेगौडा यांनी प्रज्वल रेवण्णा यांना माय वॉर्निंग नावाचे दोन पानी चेतावणी पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी लिहिले की, “गेल्या काही आठवड्यांत लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कठोर शब्द वापरले आहेत. प्रज्वलबद्दल मला काहीही माहिती नाही हे मी लोकांना समजावूनही सांगू शकत नाही. मी त्यांना समजावूनही सांगू शकत नाही की मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला त्याच्या परदेश दौऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. मी  देवावर विश्वास ठेवतो आणि मला माहित आहे की देवाला सर्व सत्य माहित आहे."

"प्रज्वलला त्याच्या आजोबांचा आदर असेल तर त्याने परत यावे. मी फक्त एकच गोष्ट करू शकतो. मी प्रज्वलला कडक ताकीद देऊ शकतो. तो कुठेही असला तरी, मी त्याला परत येण्यास सांगू शकतो आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू शकतो, असंही देवेगौडा यांनी पत्रात म्हटले आहे. "जर त्याने कुटुंबातील सदस्यांचे ऐकले नाही तर तो कुटुंबापासून पूर्णपणे विभक्त होईल, असा इशाराही देवेगौडा यांनी प्रज्वल रेवण्णा यांना दिला आहे.

अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.

याआधी १ मे रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांना जारी केलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करून तो परत करण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार आणि गृह मंत्रालयाला द्यावेत अशी विनंती केली होती. रेवण्णा सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर प्रज्वल यांनी देश सोडला होता. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.

Web Title: Former Prime Minister HD Deve gowda has warned MP Prajwal Revanna to return to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.