शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Award : 'लोकमत संसदीय पुरस्कार' सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 17:39 IST

Lokmat Parliamentary Award : येत्या १४ मार्चला होणाऱ्या 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे.

नवी दिल्ली : 'लोकमत' संसदीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा येत्या १४ मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा चौथा पुरस्कार वितरण सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 'लोकमत' संसदीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, संसदीय लोकशाहीमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संसदेच्या सदस्यांना हा पुरस्कार आठ विविध श्रेणींमध्ये (यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश) देण्यात येणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ'ब्रायन, भारतीय जनता पक्षाचे नेते तेजस्वी सूर्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नेते लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते डॉ. कुमार झा यांची 'लोकमत' संसदीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

भारतीय लोकशाहीवर होणार चर्चायेत्या १४ मार्चला होणाऱ्या 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे. 'इंडियन डेमोक्रसी : हाऊ टू क्लोज मॅच्युरिटी' या विषयावर विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत.

सर्व सदस्यांच्या कामगिरीचा केला अभ्यासज्युरी बोर्डाने विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व सदस्यांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा अभ्यास केला. सदस्य वर्षभर करत असलेली सकारात्मक कामे लक्षात घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी २०१७ साली लोकमत संसदीय पुरस्कारांची संकल्पना अस्तित्वात आली. त्यानुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये उत्कृष्ट खासदारांना माननीय उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही.

याआधी मनमोहन सिंग, अडवाणी आदी सन्मानितमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शरद पवार, मुलायम सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, जया बच्चन, सुप्रिया सुळे, निशिकांत दुबे, हेमा मालिनी, भारती पवार, सुष्मिता देव, मीनाक्षी लेखी, डॉ. रजनी पाटील यांना याआधी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

'या' सदस्यांची पुरस्कारांसाठी निवड

जीवनगौरवमल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभाभर्तुहरी मेहताब, बिजू जनता दल 

सर्वोत्कृष्ट संसदपटूअसदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएमडेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काँग्रेस

सर्वोत्कृष्ट महिला संसदपटूवंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसलॉकेट चॅटर्जी, भाजप 

सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटूतेजस्वी सूर्या, भाजप प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी

आठ वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कारसर्वांत विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (४ लोकसभेतून आणि ४ राज्यसभेतून) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डLokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डाRamnath Kovindरामनाथ कोविंद