शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घर विकले, पाहा कुणी खरेदी केले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 19:53 IST

RamNath Kovind : देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कानपूरच्या कल्याणपूरमधील आपलं घर विकलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रपती बनल्यानंतर कोविंद यांना एकदाही या घरात जाता आलं नव्हतं. आता माजी राष्ट्रपतींनी हे घर कानपूरमधील एका डॉक्टर दाम्पत्याला विकले आहे. 

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कानपूरच्या कल्याणपूरमधील आपलं घर विकलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रपती बनल्यानंतर कोविंद यांना एकदाही या घरात जाता आलं नव्हतं. आता माजी राष्ट्रपतींनी हे घर कानपूरमधील एका डॉक्टर दाम्पत्याला विकले आहे. श्रीती बाला आणि शरद कटियार या डॉक्टर दाम्पत्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं घर खरेदी केल्याचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही आहे. शुक्रवारी पॉवर ऑफ अॅटर्नीच्या माध्यमातून कानपूरमध्ये घराची नोंदणी करण्यात आली. माजी राष्ट्रपती कोविंद यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी आनंद कुमार यांच्या नावाने केली होती. त्यांनी शुक्रवारी कानपूरमध्ये नोंदणी केली. 

हे घर खरेदी केल्यानंतर डॉक्टर शरद यांनी सांगितले की, ईश्वर कृपेमुळे मला या घरात राहण्याचे भाग्य लाभणार आहे. हे माझे सौभाग्य आहे. तसेच या घराकडे मालमत्ता म्हणून न पाहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी या व्यवहाराची किंमतही सांगितलेली नाही.

दरम्यान, दिल्लीमध्ये रामनाथ कोविंद यांना भेटल्यापासून माजी राष्ट्रपतींचा साधेपणा आणि सज्जनतेचं शरद कटियार हे कौतुक करत असतात. डॉक्टर दाम्पत्य शरद आणि श्रीती बाला हे बिल्हौर येथे श्री नर्सिंग होम नावाने एक खासगी रुग्णालय चालवतात. सध्या ते कान्हा श्याम अपार्टमेंटमध्ये राहतात.  प्रोटोकॉल आणि परंपरेनुसार माजी राष्ट्रपती कोविंद यांना दिल्लीमध्ये बंगला मिळाला आहे. आता त्यांचे कुटुंबीय तिथेच राहतील. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndiaभारत