माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 06:38 IST2020-08-12T06:38:43+5:302020-08-12T06:38:55+5:30
हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार प्रणब मुखर्जी यांची तब्येत ढासळली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची तब्येत नाजूक असून त्यांना अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या ब्रेन सर्जरी करण्यात आली आहे.
त्यांना कोरोना झाल्याचे निदान मंगळवारी झाले. शिवाय त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीनं सर्जरी करण्यात आली. हॉस्पिटलच्या सूत्रांनुसार प्रणब मुखर्जी यांची तब्येत ढासळली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत.