माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा उपचारांना प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:20 IST2020-08-14T03:20:05+5:302020-08-14T03:20:18+5:30
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीरच असली तरी ते आता वैद्यकीय उपचारांना हळूहळू प्रतिसाद देऊ ...

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा उपचारांना प्रतिसाद
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीरच असली तरी ते आता वैद्यकीय उपचारांना हळूहळू प्रतिसाद देऊ लागले आहेत. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी गुरुवारी ही माहिती दिली. माझे वडील योद्धा आहेत. आताही ते आजाराशी झुंज देत आहेत. त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे ही मोठी बाब आहे, असे डॉक्टरांनीही सांगितले. प्रणव मुखर्जी यांचे सर्व अवयव काम करीत असल्याचे अभिजीत यांनी सांगितले.