शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"२०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार, मी पण लोकसभा लढवणार", ब्रीजभूषण यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:52 IST

brijbhushan sharan singh news : मागील दीड महिन्यापासून भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.

नवी दिल्ली : मागील दीड महिन्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. देशातील नामांकित महिला पैलवान २३ एप्रिलपासून सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत होते. तूर्तास सरकारच्या आश्वासनानंतर पैलवानांनी १५ जूनपर्यंत आखाड्याबाहेरील कुस्ती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह महिला प्रशिक्षकांचा लैगिंक छळ केल्याचा गंभीर आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. 

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशातच ब्रीजभूषण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय २०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

२०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार - सिंह  उत्तर प्रदेशातील गोंडा येथील संयुक्त मोर्चा संमेलनात भाजपचे खासदार आणि माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले, "२०२४ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. उत्तर प्रदेशात भाजप सर्व जागा जिंकेल. तसेच मी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे." 

पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले... पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, संवेदनशील विषयावर कुस्तीपटूंशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण करून दिल्ली पोलिसांना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत आयोगाच्या समितीकडून दोन जणांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महिला कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा मिळेल याची आम्ही काळजी घेऊ. 

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहWrestlingकुस्तीlok sabhaलोकसभाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश