शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?", विनेश फोगाटचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:35 IST

२३ एप्रिलपासून सुरू असलेल्या पैलवानांच्या आंदोलनावर काल तोडगा निघाल्याचे दिसले.

नवी दिल्ली : २३ एप्रिलपासून सुरू असलेल्या पैलवानांच्या आंदोलनावर काल तोडगा निघाल्याचे दिसले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलक पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. पण आज विनेशने एक ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?, असा प्रश्न तिने विचारला आहे.

बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले... पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, संवेदनशील विषयावर कुस्तीपटूंशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितले की, या बैठकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण करून दिल्ली पोलिसांना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल. म्हणजेच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी नवा व्यक्ती विराजमान होईल. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत आयोगाच्या समितीकडून दोन जणांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महिला कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा मिळेल याची आम्ही काळजी घेऊ, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

पण आता विनेश फोगाटने एक ट्विट करून प्रश्न विचारला आहे. "भीती आणि दहशतीच्या वातावरणात मुलींना न्याय मिळेल का?", असा प्रश्न तिने विचारला आहे. याशिवाय न्यायाच्या या लढ्याला दिरंगाई झाल्यामुळे या मुली एक एक करून हिंमत गमावणार नाहीत ना?, असे देखील तिने विचारले आहे.

 

२३ एप्रिलपासून आखाड्याबाहेरील कुस्तीभारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी देशातील नामांकित पैलवान २३ एप्रिलपासून आंदोलन करत आहेत. जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले आहे.  

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहVinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीsexual harassmentलैंगिक छळAnurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपा