शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

 "आंदोलक पैलवानांचा खेळ संपला, आता ते निवडणुक लढतील", ब्रिजभूषण यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 12:47 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत.

Brij Bhushan Sharan Singh | नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात देशातील नामांकित पैलवान मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आज २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रीजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला असला तरी आंदोलक पैलवान सिंह यांच्या अटकेवर ठाम आहेत. भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांनी नार्को टेस्ट करण्याचे आव्हान पैलवानांना दिले होते. पैलवानांनी देखील हे आव्हान स्वीकारून सर्वकाही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली लाईव्ह व्हावे असे म्हटले आहे.

दरम्यान, मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना ब्रिजभूषण यांनी पैलवानांवर बोचरी टीका केली. देशातील खरे खेळाडू मैदानात सराव करत असून जे जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत, त्यांचा खेळ संपला असल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच आंदोलक पैलवान पुढे जाऊन खेळणार नाहीत, ते आता निवडणुक लढवतील. कुस्ती महासंघात अशा घटना घडल्या असतील तर त्यांनी या आधी प्रश्न का विचारला नाही, असा सवालही त्यांनी केला.

...तुरूंगात जायला तयार - सिंह एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजभूषण यांनी म्हटले, "मी कोणत्याही खेळाडूला भेटण्यासाठी जंतरमंतरवर जाणार नाही. या खेळाडूंकडे आताच्या घडीला काहीच उरलेले नाही. आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे, याचा निर्णय दिल्ली पोलिसांच्या तपासात होईल. तपास सुरू आहे आणि तपासात माझी चूक सिद्ध झाली तर मी तुरुंगात जाण्यास तयार आहे."

आंदोलनाला एक महिना पूर्ण ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.  

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीBJPभाजपाVinesh Phogatविनेश फोगटsexual harassmentलैंगिक छळNew Delhiनवी दिल्ली