शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान वाजपेयी रुग्णालयात दाखल, राहुल गांधींनंतर मोदी, शहा, नड्डाही पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 20:41 IST

माजी पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे. रुटीन चेकअपसाठी वाजपेयींना एम्समध्ये दाखल केल्याचं भाजपानं परिपत्रकाद्वारे जाहीर केलं असलं तरी अमित शाह आणि जेपी नड्डा, नरेंद्र मोदी सोडल्यास भाजपाचे नेते वाजपेयींना पाहण्यासाठी फिरकले नव्हते.विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींची भाजपा नेत्यांच्या आधी जाऊन एम्समध्ये विचारपूस केली. राहुल गांधींच्या नंतर अमित शाह आणि मोदी एम्समध्ये पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु राहुल गांधींनाही अटल बिहारी वाजपेयींना भेटण्यास दिलं नाही. एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी करण्यात आली आहे.93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. सध्या ते राजकाणापासून अलिप्त असून त्यांनी भारतीय जनसंघाचे नेते म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तसेच 1957 मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले होते. त्यानंतर राजकीय आणि सरकारमधील अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह