शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:44 IST

Telangana Leaders Joins Congress : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे.

नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर सध्या महाराष्ट्रात आहे. पण तेलंगणात राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह अनेक नेत्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगणातील प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. खरं तर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवू पाहत आहेत. राज्यातील काही माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आज ते त्यांच्या मंत्रीमंडळासह महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ते मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

कोण आहेत पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी?पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे खम्मम लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर त्यांनी केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केला. तेलंगणा सरकारमध्ये ते ग्रामविकास मंत्री राहिले आहेत. या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समितीतून निलंबित करण्यात आले होते. तेलंगणाचे माजी मंत्री आणि पाच वेळा आमदार श्री जुपल्ली कृष्ण राव, माजी खासदार श्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांसह अनेक तेलंगण कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे