शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह विधान, आपने बड्या नेत्याचे केले पक्षातून निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:02 AM

आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

ठळक मुद्दे हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे आपचे बडे नेते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना महागात आम आदमी पक्षाने जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलेजर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती

नवी दिल्ली - हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे आपचे बडे नेते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना महागात पडले आहे. जर्नेल सिंग यांच्या फेसबूक पोस्टवरून वाद वाढल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. जर्नेल सिंग यांनी राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. दरम्यान, आता आपने या प्रकरणाचा तपास होईपर्यंत जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.

मात्र या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना जर्नेल सिंग यांनी सांगितले की, काल माझा फोन ऑनलाइन क्लाससाठी माझ्या मुलाकडे होता. त्याने एक पोस्ट कॉपी पेस्ट केली. मात्र हा प्रकार लक्षात येताच मी ती पोस्ट डिलीट केली. मी देवाच्या सर्व नावांचा, राम, गोविंद, केशव, सदाशिव सर्वांचा सन्मान करतो आणि गुरू तेगबहादूर यांच्या सिद्धांतावर चालतो, असे म्हटले आहे.आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी पत्रकारिताही केली असून, २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. चिदंबवरम यांच्यावर केलेल्या चप्पलफेकीमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. १९८४ मधील शिखविरोधी दंगलीतील कांग्रेसच्या भूमिकेविरोधात जर्नेल सिंग यांनी ही चप्पलफेक केली होती.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीPoliticsराजकारण