गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आणखी गोत्यात

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:05+5:302015-09-14T00:39:05+5:30

कागदपत्रे हस्तगत : लाचखोरीच्या काळातच मालमत्ता खरेदी

Former minister of Goa, Churchill, another cousin | गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आणखी गोत्यात

गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आणखी गोत्यात

गदपत्रे हस्तगत : लाचखोरीच्या काळातच मालमत्ता खरेदी
पणजी : गोव्यातील लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव आणखी गोत्यात आल्याचे सूत्रांनी रविवारी सांगितले. चर्चिल यांनी लाच घेतल्याचा आरोप असलेला काळ आणि त्यांनी मालमत्ता खरेदी केल्याचा काळ मिळताजुळता आहे. मालमत्ता खरेदी-विक्री दस्तऐवजांवरील तारखांत व्यवस्थित ताळमेळ बसत असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली.
चर्चिल यांचे प्राप्ती कर सल्लागार दयेश नाईक यांच्या कार्यालयावर गुन्हा अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. चर्चिल कुटुंबीयांच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली आहेत. त्यात काही मालमत्ता या कथित लाचखोरीच्या काळात घेतल्याचे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजांवरून उघड झाले आहे.

Web Title: Former minister of Goa, Churchill, another cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.