शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री अमरिश पटेल भाजपत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 05:00 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल हे येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल हे येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाला दुजोरा दिला. पटेल यांचे कट्टर समर्थक असलेले धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी भाजपत प्रवेश केला.अमरिश पटेल हे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील बडे नेते असून विधान परिषदेचे सदस्य आहेत. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.१९९० पासून चार वेळा ते शिरपूरमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले. २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक काशीराम पावरा आमदार आहेत. पावरा यांच्यासोबत शिरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार आदी उपस्थित होते.अमरिश पटेल भाजपमध्ये येणार असल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावेळी दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपत प्रवेश करीत असल्याचे काशीराम पावरा यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा