झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होत.
जुलैमध्ये त्यांना किडनीच्या विकारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
हेमंत सोरेन यांनी एक्स अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. आज मी शून्य झाल्याचे, ते म्हणाले आहेत.