माजी आयपीएस शिवदीप लांडे यांची बिहार राजकारणात एंट्री; पक्षाचं नाव काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:19 IST2025-04-10T07:19:09+5:302025-04-10T07:19:20+5:30
बिहारमध्ये गुन्हेगारीविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि तरुणांमध्ये निर्माण झालेली लोकप्रियता लक्षवेधी ठरली होती.

माजी आयपीएस शिवदीप लांडे यांची बिहार राजकारणात एंट्री; पक्षाचं नाव काय? जाणून घ्या...
पाटणा : महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील पारस गावचे सुपुत्र आणि 'सिंघम' नावाने ओळख मिळविलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी निवृत्तीनंतर बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 'हिंद सेना' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
लांडे यांच्या आई जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत. त्यांचे सासरे नेते विजय शिवतारे हे विद्यमान आमदार आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारीविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि तरुणांमध्ये निर्माण झालेली लोकप्रियता लक्षवेधी ठरली होती. त्याच जनाधारावर ते आता राजकारणात नवा अध्याय सुरू करत आहेत.
सर्व जागा लढविणार
'हिंद सेना' या नवस्थापित पक्षाच्या माध्यमातून लांडे 'सामाजिक न्याय' या मुख्य मुद्द्यावर निवडणूक लढवणार असून, बिहारमध्ये सर्व मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः लांडे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. लांडे यांच्यामुळे बिहारच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.