शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सेहवाग राजकारणाच्या मैदानात? भाजपाच्या तिकिटावर हरयाणातून लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:42 IST

रोहतक लोकसभा मतदारसंघातून नवी इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सेहवाग भाजपाकडून राजकीय इनिंग सुरू करू शकतो. रोहतक मतदारसंघातून सेहवागला राजकीय आखाड्यात उतरवण्याचा भाजपाचा विचार आहे. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचं वर्चस्व आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून सेहवागला राजकीय मैदानात उतरवलं जाऊ शकतं. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी अद्याप असा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं. सेहवाग अद्याप पक्षात सहभागीदेखील झालेले नाहीत, असं ते म्हणाले. तर दुसरीकडे भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं लोकसभेच्या तिकीटाची ऑफर सेहवागला देण्याची जबाबदारी घेतली आहे. ही व्यक्ती दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात अतिशय सक्रीय असल्याचं बोललं जातं. वीरेंद्र सेहवागबद्दल पक्षानं निर्णय घेतल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. आता याबद्दल सेहवाग नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. सेहवाग सोबतच सूफी गायक हंसराज हंसचं नावदेखील लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. हंसराज हंस काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना सिरसा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. 2014 मध्ये भाजपाला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. मतदारसंघात जाऊन कामाला लागा, अशा सूचना वरिष्ठांकडून हंस यांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :virender sehwagविरेंद्र सेहवागLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९HaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेस