शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 13:45 IST

भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. पंजाब केसरी या हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारताचा माजी खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटींची नुकसान भरपाई मागितली असून पंजाब केसरीविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

दरम्यान, गौतम गंभीरने पंजाब केसरीचे संपादक आदित्य चोप्रा आणि पत्रकार अमित कुमार आणि इम्रान खान यांच्यावर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल आणि त्याला लक्ष्य करून अनेक बनावट आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्याबद्दल खटला दाखल केला आहे.

लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाले...

गंभीरने वकील जय अनंत देहरदाई यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खटल्यात म्हटले की, हिंदी वर्तमानपत्राने त्यांच्या अनेक रिपोर्ट्समध्ये आपल्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली आहे. 'बार ंड बेंच'च्या रिपोर्ट्सनुसार, पंजाब केसरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये गंभीरची तुलना राक्षस 'भस्मासुर'शी करण्यात आली होती. खटल्यात केलेल्या दाव्यानुसार, पंजाब केसरीच्या एका रिपोर्टमध्ये गंभीर हा जातिवादी व्यक्ती आणि असभ्य राजकारणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

गंभीरने पंजाब केसरीविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिलेल्या बाबी खालीलप्रमाणे -

  • खासदार गौतम गंभीर बेपत्ता सर्वत्र लागले पोस्टर.
  • दिल्लीचे बेपत्ता खासदार लखनौ सुपर जायंट्ससाठी बनले भस्मासुर'.
  • आदेश गुप्ता बोलत राहिले, गौतम गंभीर उठून गेला.

 

अशातच गंभीरने २ कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे, जी अनाथ संघटनांना दिली जाईल. गंभीरने हे देखील सांगितले की, पंजाब केसरीचे संपादक आणि पत्रकार यांना कोणत्याही अटीशिवाय त्याची माफी मागावी लागेल. तसेच हा माफीनामा सर्वत्र प्रसारित केला पाहिजे असे गंभीरने म्हटले आहे.

 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाLucknow Super Giantsलखनौ सुपर जायंट्सJournalistपत्रकारNew Delhiनवी दिल्ली