रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:47 IST2025-07-13T18:46:33+5:302025-07-13T18:47:09+5:30

Landslide In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सराज भागात मुसळधार पावसादरम्यान, एक मोठी दुर्घटना थोडक्यात घडली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर हे या भागात आले असताना त्यांच्या वाहनावर देहरा परिसरात पर्वतावरून आलेले दगड अचानक कोसळले.

Former Himachal Pradesh Chief Minister Jairam Thakur narrowly escapes a massive landslide after stones fell on his car while he was travelling on the road. | रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचा कहर सुरू आहे. यादरम्यान हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सराज भागात मुसळधार पावसादरम्यान, एक मोठी दुर्घटना थोडक्यात घडली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर हे या भागात आले असताना त्यांच्या वाहनावर देहरा परिसरात पर्वतावरून आलेले दगड अचानक कोसळले.

करसोग येथून थुगानकडे येताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने या भूस्खलनात सापडून काही मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच जयराम ठाकूर यांनी कारमधून  उतरून लांब जात आपला जीव वाचवला. मात्र या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

तसेच या भूस्खलनाच्या घटनेनंतर धरवार थाच परिसरात भूस्खलनाची एक मोठी घटना घडली. त्यात अनेक घरांचं नुकसान झालं. तसेच रस्त्याचा मोठा या भूस्खलनामुळे नुकसानग्रस्त झाला. या भूस्खलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Web Title: Former Himachal Pradesh Chief Minister Jairam Thakur narrowly escapes a massive landslide after stones fell on his car while he was travelling on the road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.