माजी संरक्षणमंत्री ए. के.अँटोनी ब्रेन हॅमरेजमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 12:18 IST2017-11-30T09:56:51+5:302017-11-30T12:18:47+5:30
माजी संरक्षणमंत्री ए के अँटोनी यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

माजी संरक्षणमंत्री ए. के.अँटोनी ब्रेन हॅमरेजमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल
नवी दिल्ली- माजी संरक्षणमंत्री ए. के.अँटोनी यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अँटोनी यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची महिती हॉस्पिटलमधील सुत्रांकडून मिळते आहे.पण, ही गंभीर बाब नसल्याचं हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अँटोनी यांना बुधवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अँटोनी यांनी केरळचे मुख्यमंत्री व संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
76 वर्षीय माजी केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के.अँटोनी यांनी युपीए सरकारच्या काळात संरक्षण मंत्रीपद भूषविलं आहे. अँटोनी यांना अजून दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं जाणार आहे, त्यानंतर त्याला डिसचार्ज दिला जाईल, असं हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.