शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

20 गर्लफ्रेंडसचा खर्च उचलण्यासाठी 'डान्स इंडिया डान्स'च्या डान्सरने टाकला दरोडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:10 IST

चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 20 गर्लफ्रेण्ड्सना खुश ठेवण्यासाठी चोऱ्या केल्याचा खुलासा डान्सरने पोलिसांसमोर केला आहे.

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं दोन दिवसांपूर्वी अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या अदनान खान या तरुणास अटक केली. त्यावर गेल्या महिन्यात दिल्लीतील पिझ्झा आऊटलेट दरोड्याचा आरोप आहे. 22 वर्षीय अदनान दिल्लीच्या नामवंत हॉटेलमध्ये प्रसिद्ध डान्सर आहे. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्यानं आपला गुन्हा कबुल केला. पण त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली. ती माहिती ऐकून पोलिसही काही वेळ चकित झाले होते. 

चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 20 गर्लफ्रेण्ड्सना खुश ठेवण्यासाठी चोऱ्या केल्याचा धक्कादायक खुलासा अदनान खानने पोलिसांसमोर केला आहे.  अदनान हा द्वारकामध्ये डॉमिनोज् पिझा आऊटलेटमध्ये साडेतीन लाखांची लूट करणाऱ्या गँगचा सदस्य आहे. 

अदनान खानची संपूर्ण स्टोरी -अदनाने दहावीतच शाळा सोडली होती. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घ्यायला सुरुवात केली. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी त्याने यूट्यूब चॅनलही सुरु केलं. त्यानंतर तो डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, नच बलिए यासारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. इतकंच नाही, तर अदनान 2014 मधील 'मिस्टर उत्तराखंड' या स्पर्धेचा विजेताही ठरला होता. नाव कमवल्यामुळे मुलींमध्ये त्याचा बोलबाला होता. पैसे कमवण्यासाठी अदनाने दिल्लीचे क्लब्ज आणि रेस्तराँमध्ये डान्स करायला सुरुवात केली, मात्र यातून त्याला मनाजोगती कमाई झाली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

कसा आला गुन्हेगारी जगात - राम नावाच्या एका व्यक्तीने अदनानला गुन्हेगारी जगताशी ओळख करुन दिली. आपल्या टोळीत सहभागी झाल्यास पुरेसा पैसा मिळवण्याचं आश्वासन रामने अदनानला दिलं. पैशाची गरज असल्यामुळे अदनानने होकार दिला. द्वारकामधील सेक्टर 12 मध्ये असलेल्या डॉमिनोज् पिझाच्या आऊटलेटमध्ये चोरी करण्यास अदनान तयार झाला. चोरीनंतर काही दिवसातच रामला अटक झाली. हे समजताच अदनानने घरातून पळ काढला आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो लपून राहिला. अटक टाळण्यासाठी तो आपले मोबाईल नंबरही बदलत राहिला. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस