शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"देशाला घराणेशाहीतून बाहेर पडायचंय...", खासदार गंभीरकडून PM मोदींचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 19:40 IST

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाबद्दल भाष्य केले होते. आता त्याने दिल्लीतील पक्षाच्या 'सर्व समाज संमेलना'त बोलताना विरोधकांना डिवचले. भाजप खासदार गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे."

तसेच काही लोकांनी आयुष्यभर तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे. देशाला घराणेशाहीच्या राजकारणातून पुढे जायचे आहे आणि विकास आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करायची आहे, असे भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्लीतील पक्षाच्या सर्व समाज संमेलनात सांगितले.

WTC फायनलनंतर गंभीर चर्चेत भारतीय संघ पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरल्याने सर्व स्तरातून टीम इंडियावर टीका केली जात आहे. २०१३ पासून आतापर्यंत भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या आणिअखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काबीज केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय संघावर साधताना म्हटले, "मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाची नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंची पूजा केली जाते. आम्ही खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, एक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही दीर्घकाळ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.''

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाMember of parliamentखासदारNarendra Modiनरेंद्र मोदी