कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदाराचा गोव्यात प्रचारावेळी मृत्यू

By Admin | Updated: January 25, 2017 23:49 IST2017-01-25T23:49:41+5:302017-01-25T23:49:41+5:30

कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदार यु. भूपती (58) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Former Congress MLA from Karnataka died during campaigning in Goa | कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदाराचा गोव्यात प्रचारावेळी मृत्यू

कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदाराचा गोव्यात प्रचारावेळी मृत्यू

ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 25 - कर्नाटकातील माजी काँग्रेस आमदार यु. भूपती (58) यांचे बुधवारी सायंकाळी 7.30 वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेमधून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

म्हापसा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विजय भिके यांच्या प्रचारानिमित्त ते आले होते. बुधवारी भिके यांच्यासोबत ते म्हापशातील हाउसिंग बोर्ड येथील गंगानगर येथे घरोघरी प्रचार करीत होते. तेव्हा त्यांना थकल्यासारखे जाणवल्याने ते काहीवेळ खाली बसले व तेथेच कोसळले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला फोन केला असता रुग्णवाहिका अर्धा तास उशिरा पोहोचली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन नंतर म्हापसा जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने त्यांना निवडणुकीनिमित्त निरीक्षक म्हणून पाठविले होते. बुधवारी सकाळी मडगावहून ते म्हापशाला आले होते. यापूर्वी भूपती यांच्यावर बायपासही करण्यात आली होती. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी पंचनामा केला. 

Web Title: Former Congress MLA from Karnataka died during campaigning in Goa