शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:07 IST

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानं काँग्रेस नेता अडचणीत

जोधपूर: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर भाजपाकडून केली जाणारी टीका काही नवीन नाही. गेल्याच महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा नेहरुंवर टीका केली होती. मात्र आता काँग्रेसच्या माजी मंत्र्यानेच नेहरुंवर जोरदार टीका केली आहे. या मंत्र्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचा माजी मंत्री इंदिरा गांधींवरही टीका करताना दिसतो आहे. राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते भरोसीलाल जाटव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ 27 मे रोजी चित्रीत करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. करौलीमध्ये नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जाटव बोलत होते. नेहरु आणि इंदिरा गांधींनी देशाची फसवणूक केली, असं जाटव या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेल्या जाटव यांनी या प्रकरणाचं खापर भाजपावर फोडलं आहे. हा सर्व भाजपाचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'मी 27 मे रोजी नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण केलं होतं. त्यावेळी मी नेहरु आणि इंदिरा गांधींच्या स्मृतींना उजळा दिला होता. इंदिरा गांधींनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं, असं मी म्हटलं होतं. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असून माझ्याविरोधात कट कारस्थान रचण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे,' असा आरोप जाटव यांनी केला. जाटव राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री होते.  

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलPoliticsराजकारण