शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 10:16 IST

फारुक अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.

श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. फारुक अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, जोपर्यंत कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्या विलगीकरणात राहतील, असेही ओमर यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला यांनी याच महिन्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता. 

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले, माझे वडिल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत आम्ही  कोरोना चाचणी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही कुटुंबातील इतरही सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. तसेच, गेल्या काही दिवसांत आमच्याशी संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. 

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट जाणवत असून दिवसला 50 हजारांपेक्षा बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी, जवळपास 30 हजारांपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यामुळे, देशभरातून कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे बजावण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, गरज पडल्यास राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

काश्मीरमध्ये कोरोना 

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 235 रुग्ण पाझिटीव्ह आढळून आले आहेत. तर, 126 जणांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 30 हजार 228 पर्यंत पोहोचली आहे. तर, आजपर्यंत 1 लाख 26 हजार 129 जणांनी कोरोनावर मात दिलीय. कोरोनामुळे 1989 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 2 हजार 110 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.  

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीJammu Kashmirजम्मू-काश्मीरCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmar Abdullahउमर अब्दुल्ला