शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:19 PM

वसीम रिझवी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे हिंदू नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे.

गाझियाबाद: शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज हिंदू धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. धर्म बदलल्यानंतर त्यांचे नवीन नाव हरबीर नारायण सिंह त्यागी झाले आहे. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्म मिळवून दिला आणि त्यानंतर रिझवी यांचे नाव बदलले. यावेळी नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत.

इस्लाममधून मला बहिष्कृत केले

हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर रिझवी म्हणाले की, मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. सनातन धर्म हा जगातील पहिला धर्म असून त्यात चांगुलपणा आणि मानवता आढळते. आम्ही इस्लामला धर्म मानत नाही. मोहम्मद पैगंबरांनी निर्माण केलेला इस्लाम हा धर्म वाचून आणि त्यांचा दहशतवादी चेहरा पाहिल्यानंतर तो धर्म नाही हे मला समजले आहे.

इस्लाम दहशतवादी गट

ते पुढे म्हणाले की, इस्लाम हा एक दहशतवादी गट आहे, जो 1400 वर्षांपूर्वी अरबस्तानमध्ये तयार झाला होता. प्रत्येक जुम्मा प्रार्थनेनंतर, आम्हाला मुंडके कापण्यास सांगितले जाते. मला मुस्लिम म्हणायला लाज वाटते, म्हणून मी सनातन धर्म स्वीकारला आहे. मी सनातन धर्म निवडला कारण तो जगातील सर्वात जुना धर्म आहे. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे, तसेच हवन-यज्ञही होणार आहे. महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत. 

काही दिवसांपूर्वीच जारी केले मृत्यूपत्र वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच मृत्यूपत्र जारी केले आहे. यात त्यांनी घोषणा केली आहे, की मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, तर हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. एवढेच नाही, तर यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, असेही रिझवी यांनी म्हटले होते.

कुराणातील 26 आयत हटवण्यासाठी याचिका दाखल केली होती

वसीम रिझवी मूळचे लखनऊचे आहेत. सन 2000 मध्ये ते लखनऊच्या मोहल्ला काश्मिरी वॉर्डातून सपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2008 मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले आणि नंतर चेअरमन झाले. वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली. या याचिकेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वसीम रिझवी यांना दंडही ठोठावला होता. 

'मोहम्मद' पुस्तकातून चर्चेतरिझवी आता पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतेच 'मोहम्मद' हे पुस्तक लिहिले होते. यावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. रिझवी यांनी या पुस्तकाद्वारे पैगंबरांच्या गौरवाचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरुंनी व्यक्त केली आहे. त्यानंतर वसीम रिझवींनी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :HinduहिंदूIslamइस्लाम