शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

सीबीआयच्या संचालक पदावरुन हटवल्यानंतर आलोक वर्मांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 16:07 IST

सरकारनं दिलेली नवी नियुक्ती स्वीकारण्यास वर्मांचा नकार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीनं सीबीआयच्या संचालक पदावरून हटवल्यानंतर आलोक वर्मा यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आहे. काल रात्री मोदींच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीनं वर्मा यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती फायर सर्व्हिस अँड होम गार्डच्या महासंचालकपदी करण्यात आली. यानंतर आज दुपारी वर्मा यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर लगेचच वर्मांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. 1979 च्या केडरचे आयपीएस अधिकारी असलेले आलोक वर्मा सीबीआयचे 27वे संचालक होते. त्याआधी त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलं. 31 जानेवारीला ते निवृत्त होणार होते. 1 फेब्रुवारी 2017 रोजी त्यांची सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. सीबीआयचे संचालक म्हणून त्यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त होती. भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे 2 वर्षांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना पदावरुन दूर करण्यात आलं. वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अस्थानांविरोधात एफआयआर दाखल झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर सरकारनं दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. याविरोधात वर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले. 8 जानेवारीला न्यायालयानं वर्मा यांच्या बाजूनं कौल देत सरकारला जोरदार धक्का दिला. न्यायालयानं वर्मा यांना सीबीआयचे संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले. यासोबतच निवड समितीला वर्मांवरील आरोपांप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घेण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं वर्मांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सिकरी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता. या समितीनं वर्मांची नियुक्ती फायर सर्व्हिस अँड होम गार्डच्या महासंचालकपदी केली. मात्र ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत वर्मांनी सरकारकडे राजीनामा पाठवून दिला. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागResignationराजीनामाNarendra Modiनरेंद्र मोदी