शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

भाजपाच्या माजी आमदाराने काढली विद्यार्थिनीची छेड, जमावाकडून मारहाण, कान पकडून मागायला लावली माफी

By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 7:29 PM

Former BJP MLA molestation of Girl Update : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये भाजपाच्या एका माजी आमदारावर छेडछाडीचा आरोप करत जमावाने त्याला मारहाण केली. तसेच कान धरून माफी मागायला लावली.

ठळक मुद्देभाजपाचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा केला आरोपपीडित तरुणीने केलेल्या आरोपांची माहिती मिळाल्यानंतर तिचे नातेवाईक झाले संतप्त त्यांनी कॉलेजमध्ये धडक देत भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांना मारहाण केली. तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार केला

वाराणसी - गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारांमुळे उत्तर प्रदेशचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, आता राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाच्याच एका नेत्याने छेडछाड केल्याचा आरोप झाला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्येभाजपाच्या एका माजी आमदारावर छेडछाडीचा आरोप करत जमावाने त्याला मारहाण केली. तसेच कान धरून माफी मागायला लावली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.ही घटना वाराणसीमधील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगतुआ गावातील आहे. तिथे एका इंटर कॉलेजचे चेअरमन असलेले भाजपाचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला.पीडित तरुणीने केलेल्या आरोपांची माहिती मिळाल्यानंतर तिचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी कॉलेजमध्ये धडक देत भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांना मारहाण केली. तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार केला. आता वाराणसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.माया शंकर पाठक हे एकेकाळी वाराणसीमधून भाजपाचे आमदार होते. आता ते एमपी इन्स्टिट्युट अँड कॉम्प्युटर कॉलेज या नावाने शिक्षणसंस्था चालवतात. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांनी पीडित विद्यार्थिनीला ऑफीसमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.त्यानंतर पीडितेने घरी जाऊन ही घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी संस्थेत येऊन मायाशंकर पाठक यांची पिटाई केली. सुरुवातीला त्यांना ऑफिसमध्ये मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना मैदानात आणून खुर्चीवर बसवून मारहाण केली. यादरम्यान, भाजपा आमदार वारंवार आपल्या चुकीसाठी कान धरून माफी मागताना दिसत होते.मात्र दोन्ही पक्षांकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे या प्रकाराची पोलिसांनी स्वत: दखल घेत याचा तपास सुरू केला आहे. मायाशंकर पाठक १९९१ मध्ये वाराणसीमधील चिरईगांव विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटीवर विजय मिळवला होता.

टॅग्स :VaranasiवाराणसीBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी