शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Lalu Yadav : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:52 IST

लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे.

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. 'लँड फॉर जॉब' प्रकरणात लालू दोषी असल्याचे उघड झाले असून त्यांची आणि कुटुंबीयांची ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

जॉबसाठी जमीन प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने सोमवारी लालू कुटुंबाची ६ कोटींची मालमत्ता जप्त केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने याप्रकरणी लालू कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे. 

"हे राजकीय षडयंत्र"

दरम्यान, लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. 'जमिनीच्या बदल्यात नोकरी'चे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. सीबीआयने यापूर्वी दोनदा या प्रकरणाचा तपास केला असून त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. यानंतर सीबीआयने हे प्रकरण बंद केले होते. मग आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कुटुंबीयांनी लगावला. 'लँड फॉर जॉब' अर्थात जॉबसाठी जमीन याप्रकरणी सीबीआयच्या टीमने मे महिन्यात देशातील ९ ठिकाणी छापेमारी केली होती.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. त्यांनी विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलTejashwi Yadavतेजस्वी यादवEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय