शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:24 IST

India Post: आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन  प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे.

मुंबई - आपत्कालीन मदत असो, की ऑनलाइन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्या यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डिजिपीन  प्रणाली सुरू केली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणार आहे. देशातील प्रत्येक ठिकाणाचा या १० अंकी पिनमुळे आता अचूक पत्ता मिळेल. यूझरला अधिकृत संकेतस्थळावरून हा क्रमांक मिळवता येणार आहे. 

नेमके काय होणार फायदे? रुग्णवाहिका, अग्निशमन दलास पत्ता अचूक शोधता येईल. लॉजिस्टिक्स, कुरिअर डिलिव्हरी, कॅब बुकसाठी वापर. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभ होईल.डिजिपीनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढण्यात मदत होईल. पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम करण्यात फायदा होईल.

कसा आणि कुठे जनरेट करावा? नकाशावरील आपले अचूक स्थान सांगणारा डिजिटल पिन स्वत: जनरेट करता येईल. https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या संकेतस्थळाला भेट द्या. येथे तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन ॲक्सेस देऊन १० अंकी डिजिपीन तयार होईल. 

पिन कोड, डिजिपीनमधील फरक काय? सहा अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो. डिजिपीन मात्र, विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे.

या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव,  जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंतही अचूक ठिकाणी पोहोचू शकतो. ही संकल्पना संपूर्ण देशाच्या क्षेत्राला ४ बाय ४ मीटर आकारात विभागते.

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसIndiaभारत