शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 1:58 PM

उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देहत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना40 वर्षीय सादिक रहमान जलपैगुडी येथे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतेहत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादिक रहमान यांचा जागीच मृत्यू झाला

कोलकाता - जंगलात सफारी करताना गाडीतून उतरणे धोकादायक असते, त्यामुळेच पर्यटकांना गाडीतून न उतरण्याची सूचना असते. पण अनेकदा पर्यटक सुचनांकडे दुर्लक्ष करत प्राण्यांना जवळून पाहण्याच्या मोहापायी गाडीतून उतरत जीव धोक्यात घालताना दिसतात. उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग 31 वर घडलेल्या या घटनेमुळे काळी काळासाठी वाहतूक ठप्प झालं होतं. 

40 वर्षीय सादिक रहमान जलपैगुडी येथे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. कामावर जात असताना त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आणि प्राण्यांचा फोटो काढण्यासाठी गाडीतून खाली उतरले. यावेळी हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हत्तीचं रौद्र रुप पाहून उपस्थितांकडे समोर जे होतंय ते पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जवळपास 15 मिनिटं हत्तीचा हौदोस सुरु होता. सादिक रहमान यांच्यावर हल्ला केल्यानंतर हत्ती जंगलात निघून गेला. हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादिक रहमान यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

'या परिसरात हत्तींची संख्या जास्त आहे. ते नेहमीच दिसत असतात, त्यात काही नवीन नाही. तसं पहायला गेलं तर ते रोजच हायवे क्रॉस करत असतात. आणि त्यावेळी कोणीही आपल्या गाडीतून खाली उतरायचं नाही असा नियमच आहे. सादिक रहमानने हा नियम मोडला आणि त्याचा मृत्यू झाला', अशी माहिती वनअधिका-याने दिली आहे. 

राज्याच्या वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हत्तीच्या हल्ल्यात गतवर्षी 84 लोकांचा मृत्यू झाला होता. ट्रेनने धडक दिल्याने झालेल्या अपघातातही अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. 

आणखी वाचा :   ...जेव्हा नाशिकमध्ये चक्क सायकलवर स्वार होतो ‘इंडियन कोब्रा’

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग